महिला व बाल विकास आयुक्त, मा. श्री. डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) यांची निरीक्षणगृह/बालगृहास भेट.

You are currently viewing महिला व बाल विकास आयुक्त, मा. श्री. डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) यांची निरीक्षणगृह/बालगृहास भेट.
  • Post category:Events News
  • Post comments:0 Comments
  • Reading time:2 mins read
Spread The Awareness

आज दिनांक 21.08.2023 रोजी मा. श्री. डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित, निरीक्षणगृह/बालगृह (मुलांचे) औरंगाबाद या संस्थेस भेट दिली. भेटी दरम्यान संस्थेचे पधाधिकारी, यांच्या सोबत चर्चा केली. संस्थेचे पदाधिकारी यांनी मा. आयुक्त साहेबांना संस्थेच्या कामकाजाबाबत तसेच भविष्यातील योजनांची माहीती दिली. मा. आयुक्त. साहेबांच्या बालगृहात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मा. आयुक्त महोदयांनी संस्थेतील बालकांची निवास, भोजन, इमारत, उपलब्ध सोई-सुविधांची पाहणी केरून समाधान व्यक्त केले. मा. आयुक्त महोदयांनी संस्थेतील बालकांसोबत संवाद

साधून बालकांना मार्गदर्शन करून पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या. यावेळी संस्थेतील बालकांनी स्वागत व प्रार्थना गायण केले.

या संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. मानसिंह पवार यांनी मा. डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) यांचे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले तसेच संस्थेचे कार्यकारीणी सदस्य मा. श्री. अवधुत जगताप यांनी

मा. श्रीमती हर्षा देशमुख विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद पांचे देखील पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. संस्थेचे सहकोषाध्यक्ष मा. श्री. वामनराव दोणकर यानी मा. श्री. प्रमोद निकाळजे, यांचे पुष्पगुच्छ वः शॉल श्रीफळ देवून स्वागत केले. मा. श्री. वामनराव दाणेकर यांनी मा. श्री. एस. व्ही. अंकुश, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, औरंगाबाद तसेच बाल कल्याण समिती सदस्य मा. श्री. गजानन सुर्यवंशी यांचे स्वागत केले. बाल कल्याण समितीच्या सदस्य मा. श्रीमती, वर्षा वाघचौरे यांचे स्वगत मा. श्री. अवधुत जगताप यांनी केले.

यावेळी सस्येचे प्रभारी अधीक्षक श्री. चंद्रभान जंगले यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी सस्येचे बाल विकास अधिकारी श्री दिपक निमोणे,काळजी वाहक श्री. जगदिश बिरसोने, श्री. शेख फयाजीचीन, समाधान लोखंडे, विशांत हावळे व संस्थेतील बालक हजर होती.


Spread The Awareness

Leave a Reply