HSC Success Story: लहान वयातच आई-वडिलांचा आधार हरपलेला दत्तू 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील निरीक्षणगृहात दाखल झाला. बारावीच्या परीक्षेत त्यानं उत्तुंग यश मिळवलं.
आई-वडिलांचा आधार लहानपणीच हरवलेला, निरीक्षणगृहात वाढलेला आणि कुटुंबापासून दूर असलेला दत्तू अशोक जाधव याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावीत 92.17 टक्के गुण मिळवले. संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणाला आधार बनवत तो आता आयएएस होण्याच्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे.
लहान वयातच आई-वडिलांचा आधार हरपलेला दत्तू 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील निरीक्षणगृहात दाखल झाला. दत्तूच्या आईचा मृत्यू जळून झाला होता. तर वडिलांवर आरोप असल्याने त्यांना अटक झाली आणि ते तुरुंगात आहेत. तेव्हापासून दत्तूसह चौघी भावंडे पोरकी झाली. त्यांची रवानगी वेगवेगळ्या निरीक्षणगृहांत करण्यात आली.